बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मुंबई | राज्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव ओसरत असल्याने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला. ठाकरे सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवताना रेल्वे प्रवाशांबाबत देखील अपडेट दिली होती. राज्य सरकारने रेल्वे प्रवाशांवरील निर्बंध हटवल्यानंतर आता रेल्वेनेही मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांना लोकलने (Local Train) प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक होते. मात्र ठाकरे सरकारने (Thackeray Goverment) कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वेनेदेखील कोविड संदर्भातील सर्व निर्बंध उठवले आहेत.

सर्व मुंबईकरांसाठी आता तिकीट काउंटरवर आणि अॅपवर देखील तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकल प्रवाशांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नसल्याचं रेल्वे प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोविड काळात बंद करण्यात आलेले सर्व अधिकृत एन्ट्री-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्कलेटर उघडण्यात येणार आहेत. तसेच फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काऊंटर आणि बुकिंगसाठी ईव्हीएम मशिन देखील आता उघडल्या जाणार असल्याची माहिती एका रल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”

तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”

मनसेला मोठा धक्का! मुस्लिम कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More