बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला झटका

मुंबई | शिंदे सरकार सत्तेत आलं आणि तत्कालिन ठाकरे सरकारचे सगळे निर्णय बदलण्याचा सपाटाच शिंदे सरकारने लावला आहे. यातीलच एक महत्वाचा निर्णय म्हणजे आरे (Aarey)  कारशेडचा होता. या निर्णयाला ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आली होती. मात्र शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर त्याला परवानगी दिली.

मंजूरी दिल्यानंतर तातडीने कामही सुरू करण्यात आले. डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या काही झाडांचीही छाटणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी सर्वाच्च न्यायालात (In the Supreme Court) धाव घेतली.या याचिकेवर आज सर्वाेच्च न्यायालयात सुणावणी होणार होती. ही सुनावणी न्यायमुर्ती चंद्रचूड यांच्या अध्येक्षतेखाली खंडपीठासमोर होणार होती. मात्र आज ही सुनावणी न्यायमुर्ती लळीत यांच्या अध्येक्षतेखाली पार पडली.

याचिकेवर सुनावणी करताना कारशेडच्या कामासाठी पुढील सुणावणी होईपर्यंत आरे मधील एकही झाड तोडू नये किंवा कापू नये, असे निर्देश शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (Mumbai Metro Rail Corporation) दिले आहेत. तसेच यासंबधीची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे. या निर्णयामुळे शिंदे सरकारला धक्का बसला असल्याची चर्चा सुरु आहे.

याबद्दल बोलताना आरे कारशेड संबधी कोणतेही झाड तोडण्यात आले नसून एका झाडाची फांदी तोडण्यात आली आहे, अशी माहिती एमएमआरसीकडून (MMRC)  देण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More