बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणार नोकरी!, राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई | कोरोना काळात सेवा करत असताना अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सेवकापासून ते अधिकारी वर्गापर्यत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच कोरोना काळात ज्या अधिकाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात शासकीय सेवेत गट क आणि ड कर्मचाऱ्यांसाठीच अनुकंप धोरण लागू होतं. पण काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुकंपा धोरण गट अ आणि ब यांसाठी सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गट अ किंवा ब मधील अधिकाऱ्यांचं निधन झाल्यास त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीस गट क किंवा ड मध्ये अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात येणार आहे. याबरोबर अनुकंपा नियुक्तीचे विविध आदेश एकत्र करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 ची मान्यता देण्यात आली आहे. या नविन नियमावलीमुळे अनुकंपासाठी उद्भवणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

कोरोना महामारीच्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावलं आहे. या कठीण काळात ज्या अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्यासाठी अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला मान्यता दिली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुकंपा धोरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सहमतीने संमत करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

महाराष्ट्रात ‘या’ वेळेत पुन्हा संचारबंदी?, केद्रानं दिल्यात स्पष्ट सूचना

‘बुलेटबंदी’ गाण्यावर रुग्णालयात नर्सचे ठुमके, आता मात्र सापडलीय संकटात!

डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरींची वाहन उत्पादकांना मोठी सूचना

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली?, राजकीय वर्तुळात एकच चर्चा

“आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला पाहून फार वेदना होतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More