बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | घर खरेदी करणारा एकतर्फी नियम व अटी मान्य करण्यासाठी बांधिल नसेल. ग्राहक संरक्षण अॅक्टअँतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अपार्टमेंट बायर्स अॅग्रीमेंटच्या अटी एकतर्फी आणि गैरवाजवी, याशिवाय अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस असल्याचं सांगितलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुरुग्राममधील एका प्रोजेक्टवर सुनावणी देताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. बिल्डरने एक प्रोजेक्ट राष्ट्रीय उपभोक्ता आयोगाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने बिल्डरविरोधात कडक कारवाई केली.

हे प्रकरण 1 कोटी 60 लाख रुपयांचं आहे. जर या आदेशाचं पालन करण्यात आलं नाही, तर या प्रकरणात घर खरेदीदाराला संपूर्ण रक्कम 12 टक्के व्याजासह द्यावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.

जर बिल्डरने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करुन ग्राहकाला दिला नाही तर त्याला घर खरेदी करणाऱ्याला पूर्ण पैसे परत द्यावे लागतील. आणि व्याजही द्यावं लागेल. अशात व्याजाचे पैसे 9 टक्क्यांनी परत द्यावे लागतील, असं न्यायालयाने सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

“ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, पण आता…”

“नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की, लोक चंपा म्हणतात”

भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला- संजय राऊत

“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही?”

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More