श्रद्धा वालकर प्रकरणी पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा!
मुंबई | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचं मोठं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.
पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचं डीएनए सॅम्पल घेतलं होतं. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, श्रद्धा वालकर या तरुणीसोबत लिव्ह-ईन (Live-in) मध्ये राहणाऱ्या आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला.
मूळचे वसई येथील असलेले श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने हे दोघेही दिल्लीत स्थायिक झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या करत तिच्या शरिराचे तुकडे केले.
महत्त्वाच्या बातम्या-
- बॅंकेत खाते उघडताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान
- iPhone वापरणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज!
- मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
- ‘या’ टीप्स फाॅलो केल्या तर हिवाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून होऊ शकतो बचाव
- मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा, म्हणाले…
Comments are closed.