बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | लहान मुलांचा दररोजच्या पोळी भाजीच्या जेवणापेक्षा काहीतरी गोड खाण्याकडे जास्त कल असलेला पाहायला मिळतो. सकाळच्या नाष्ट्यासाठी जाम आणि ब्रेड खाण्याची सवय अनेक मुलांना असते. परंतु ही सवय आरोग्यासाठी हानिकारक तर नाही ना?, याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. अनेक लोकांच्या घरी न्याहारीसाठी दररोज मिक्स फ्रुट जाम खाण्यात येतो. मात्र ही जाम आणि ब्रेड खाण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

विविध फळांपासून बनवलेले जाम संशोधकांनी 5 महिन्यांसाठी 25 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले. त्यातील फिनॉलिक कंपाऊंड, अँटीऑक्सिडंट्स आणि अॅथोसायनिनची पातळी तपासली. या सर्व फळांमधील फिनॉलिक कंपाऊंड, अँटीऑक्सिडंट्स आणि अॅथोसायनिन जाम बनवण्याच्या प्रक्रियेत कमी झाल्याचं संशोधकांच्या निदर्शनास आलं. अंजीर, संत्री, चेरी आणि जर्दाळू या फळांपेक्षा स्ट्रॉबेरीमध्ये जास्त प्रमाणात फिनॉलिक कंपाऊंड्स आढळले.

जाम बनवताना फळं उकळली जातात. यामुळे फळांमधील पाण्याचे प्रमाण कमी होते व व्हिटामीन-सी सारखी पोषकतत्वे नष्ट होतात. जामसारख्या प्रीझर्व फूडमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. यामुळे मेंदुला पोट भरल्याचे चुकीचे संदेश दिले जातात.

दररोज जाम खाल्ल्यामुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन लठ्ठपणा वाढतो. यामुळे हृद्यविकाराचा धोकाही निर्माण होतो. संशोधकांनी अंजीर, संत्री, चेरी आणि जर्दाळू या फळांचा अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल रिसर्चगेट डॉट नेटमध्ये करण्यात आला असल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनीने प्रकाशित केलं आहे. जामच्या ऐवजी फक्त फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे, असं संशोधकांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना…; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More