नवी दिल्ली | देशातील कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा देशात शिरकाव झाल्याने पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
XE व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढवली असताना देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लाखोंमध्ये असलेली सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे.
रविवारी देशात कोरोनाचे 1 हजार 54 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 29 कोरोनाबाधित रूग्णांचा रविवारी मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख खाली आल्याने प्रशासनासह नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कोरोना बहुरूपी आहे. आपलं रूप बदलून तो पुन्हा येतोय. कोरोना अजूनही गेलेला नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने देशात कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहे. मात्र, देशातील कोरोनाचे निर्बंध हटवले असले तरी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”
महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार
‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा
सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे…”
Comments are closed.