बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूझीलंडविरूद्ध हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; विराट कोहली म्हणतो…

दुबई | युएईच्या धर्तीवर जगातील सर्वात रोमांचक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताला पहिल्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारताच्या अंतिम 11 खेळाडूंवर जोरदार टीका झाली होती. पण कर्णधार विराट कोहली आपल्या खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या काळात आपल्या लयीत नसल्यानं त्याच्यावर सर्वस्तरातून टीका होतं आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात पांड्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. पण या दुखापतीतून तो सावरला आसून आगामी सामन्यात पांड्या गोलंदाजी करताना पहायला मिळण्याची शक्यता कर्णधार कोहलीनं व्यक्त केली आहे. परिणामी भारतीय संघाची चिंता मिटण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याला अंतिम षटकात ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखलं जातं. पण गेल्याकाही महिन्यांपासून पांड्याला चांगला खेळ करता आला नाही. पांड्या सततच्या दुखापतीनं सध्या त्रस्त आहे. पांड्या फाॅर्मात नसल्याचा मोठा फटका भारताला बसत आहे. परिणामी पांड्याला अंतिम संघातून वगळण्याची मागणी अनेक दिग्गज व्यक्त करत आहेत. अशात कर्णधार कोहली काय निर्णय घेतो हे पहाणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना 31 तारखेला न्यूझीलंडसोबत आहे. न्यूझीलंड संघाला सुद्धा त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. परिणामी दोन्ही संघांसाठी उद्याचा सामना करा अथवा मरा या परिस्थितीचा आहे.

थोडक्यात बातम्या 

“दिवाळीत खानांचे चित्रपट रिलीज होतात आता या दिवाळीत स्वत: खान रिलीज झालेत”

ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचं सावट! राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

देह त्यागिता कीर्ती मागे उरावी! जाता जाता पुनीत राजकुमार यांनी केलं ‘हे’ महान काम

‘येत्या डिसेंबरमध्ये शिवसेनेतील…’; नारायण राणेंचा मोठा दावा

“…म्हणून मला कधी मंत्री व्हावं वाटलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More