मुंबई | आपल्या मधूर गायनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गाणकोकिळा म्हणजेच लता मंगेशकर सध्या तब्येतीच्या नाजूक अवस्थेतून प्रवास करत आहेत. सध्या मंगेशकर यांना ब्रिच कॅंडी रूग्णालयात डाॅक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. डाॅक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.
लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये दाखल असून आज त्यांच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे, असं डाॅक्टर प्रतित समदानी यांनी सांगितलं आहे. रूग्णालय सातत्यानं नागरिकांना त्यांच्या तब्येतीबाबत सांगत आहे. आजही रूग्णालयानं त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट जारी केले आहेत. सर्वजण लतादीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.
लतादीदींवर औषधांचा परिणाम दिसत आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डाॅक्टर समदानी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या तब्येतीबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून त्या लवकर बऱ्या होतील, अशी आशा आहे. काही दिवसांपूर्वीच लतादीदींना कोरोनाची लागण झाली होती. परिणामी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, लतादीदींच्या तब्येतीबाबत कोणही चुकीची माहिती प्रसिद्ध करू नका असं आवाहन त्यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रिनिवासन अय्यर यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण
KL Rahul ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; रक्कम ऐकून थक्क व्हाल!
“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला
“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”
“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका
Comments are closed.