पुरूषांच्या सेक्स लाईफबाबत अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | ताणतणाव, दगदग यासारख्या कारणांमुळे पुरूषांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सध्या पुरूषांच्या आयुष्यात शुक्राणुंची (Sperms) कमतरता, वंध्यत्व (Infertility) या समस्या सामान्य बनत चालल्या आहेत. मात्र, या समस्यांसाठी महागडी औषधं घेणं हा एकमेव उपाय नाही. घरात सहज उपलब्ध असलेला एक पदार्थ पुरूषांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

बडिशेप (Fennel) आपल्या घरात अगदी रोज जेवण झाल्यानंतर खाल्ली जाते. बडिशेप ही फक्त पचनासाठीच चांगली नाही तर याचे अनेक गुणकारी फायदे पण आहेत. बडिशेपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्व आढळात. बडिशेपमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांचा साठाच आहे.

पोटाच्या समस्यांसोबतच ही बडिेशेप पुरूषांसाठी चांगलीच फायद्याची आहे. पुरूषांनी रोजच्या जेवणात बडिशेपचं सेवन केलं तर शुक्राणुंची गुणवत्ता वाढण्यात मदत होते. यासोबतच पुरूषांच्या हार्मोन्सशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

बडिशेपच्या सेवनामुळे वंध्यत्व दूर होण्यास देखील मदत होते. बडिशेपमुळे शरीरातील शुक्राणुंची संख्या वाढते आणि परिणामी शीघ्रपतन, वध्यंत्वाची समस्या सुटतेच पण शारीरिक संबंध देखील सुधारतात.

धकाधकीच्या जीवनामुळे पुरूषांच्या शरीरातील उर्जा आणि यामुळे कामवासना देखील कमी होते. बडिशेपचं नियमीत सेवन केलं तर पुरूषांच्या आयुष्यातील ही समस्या देखील दुरू होऊ शकते.

दरम्यान, जेवणानंतर एक चमचा बडिशेप खाणं अत्यंत फायदेशीर आहे. बडिशेपमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, लोह आणि पोटॅशियम देखील असतं. या पदार्थांमुळे पोटाच्या समस्या आणि पुरूषांच्या देखील लैंगिक समस्या कमी होतात.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More