मुंबई | आपल्या देशात मंकी पॉक्सची एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आपल्या येथे आढळलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, ज्या देशात या आजाराचे रूग्ण आढळले आहेत त्या देशातून येणाऱ्या लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग सुरू केलं आहे. या स्क्रिनिंगच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास त्या व्यक्तीचे स्वॉब घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (national institute of virology) पाठवत आहोत, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
मांकीपॉक्स जगभर वेगाने पसरत आहे. आता स्वित्झर्लंड आणि इस्रायलमध्ये या विषाणूची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. दोन्ही देशांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे.
हा विषाणू अनेक युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये आढळून आला आहे. आफ्रिकन देशांतून परतलेल्या लोकांवर याचा परिणाम होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी पुन्हा येईन हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून”
“बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार”
मोठी बातमी! कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द
हसिना पारकरच्या मुलाचे ईडी चौकशीत डॉन दाऊद इब्राहीमबाबत धक्कादायक खुलासे!
शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक; दिला गंभीर इशारा
Comments are closed.