बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | प्रसिद्ध विनोदवीर (Comedian) राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांना बुधवारी जीम करत असाताना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांनंतर त्यांना लगेच रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या चाहत्यांत नाराजी पसरली आहे. त्यातच आता त्यांच्या प्रकृतीतबद्दल चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे.

श्रीवास्तव यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांना वेंटीलेटेरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या ह्रदयामध्ये 100 टक्के ब्लाॅकेज आढळल्यामुळे सध्याची परिस्थीती प्रचंड नाजूक असल्याचे सांगितले आहे, परंतु तरीही ते केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे ते ठीक होतील असंही डाॅक्टरांनी सांगितले आहे.

त्यांच्या तब्येतीमुळे कलाक्षेत्रात चिंतेचे वातवरण झाले आहे. त्यांचे चाहतेही सोशल मिडीयावर कमेंट्स करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. दरम्यान, बुधवारी ते जीम करत असाताना त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना लगेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते काही नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते, परंतु भेटीपूर्वीच त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दरम्यान, राजू श्रीवास्तव हे राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. Comedy ka Maha Muqubla, The Great Indian Laughter Challenge या कार्यक्रमांनी त्यांना विशेष ओळख दिली. या सोबतच त्यांनी बिग बाॅस 3 आणि नच बलिये या रिअ‌ॅलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी, पुढील 4 तास पाऊस झोडपून काढणार

टीईटी घोटाळा प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाविषयी शरद पोंक्षे यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More