कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | कोरोनाच्या (Corona Virus) ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होतं. मात्र, ओमिक्रॉनच्या ‘स्टेल्थ’ या नव्या प्रकाराने संपूर्ण जगाचं टेंशन वाढवलं आहे. अनेक देशात या व्हेरिएंटने धुमाकुळ घालायला सुरूवात केल्याने भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे.
युरोपीयन देशात स्टेल्थ (Stealth Varient) व्हेरिएंटने मोठ्या प्रमाणात हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. तर अमेरिकेत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांपैकी 33 टक्के कोरोना रूग्णात याच घातक व्हेरिएंटची लक्षणं आढळून आली आहेत. या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव बघता देशासह महाराष्ट्रही सतर्कता बाळगली जात आहे.
जगभरातील कोरोना संसर्गात होणारी वाढ ओमिक्रॉनमुळे होत असल्याचं मत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्याकडे आलेली तिसरी लाट ओमिक्रॉनची असल्याने आपल्याला लगेच काही धोका नाही. विषाणूमध्ये ठळक बदल झाले तरच धोका आहे, अन्यथा नाही, असंही डॉ. आवटे म्हणाले आहेत.
दरम्यान, युरोप आणि अमेरिकेत झपाट्याने पसरणारा स्टेल्थ व्हेरिएंट भारतात कोरोनाची चौथी लाट आणू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, महाराष्ट्राला सध्या तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
मिस यूनिवर्स हरनाज संधूचं हिजाब वादावर मोठं वक्तव्य, म्हणाली…
“25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे”
मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”
कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार
Comments are closed.