बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

पुणे | पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे स्थानकावर ही बॉम्बसदृश वस्तू सापडली. त्यानंतर सतर्कता म्हणून काही काळासाठी रेल्वे वाहतूक देखील बंंद करण्यात आली.

या वस्तूची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक देखील घटास्थळी दाखल झाले. मात्र, या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

पुणे स्थानकावर एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याचं वृत्त आहे. मात्र, तपासात तो फटाका असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पुणे स्थानकावर काहीही संशयास्पद आढळलं नाही. तो फक्त फटाका होता. आम्ही त्याची कसून तपासणी केली. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ डिएफसी उदयसिंग पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, स्थानकावर बॉम्ब असल्याची बातमी काही वेळातच वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यामुळे शहरात काही काळासाठी चिंतेचं वातावरण होतं. मात्र, पुणे स्थानकावर आढळलेली बॉम्बसदृश वस्तू फटाका असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”

‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले

‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं

किम जोंग उनच्या उत्तर कोरियात कोरोनाचा विस्फोट; धक्कादायक आकडेवारी समोर

सावधान! लहान मुलांवर घोंगावतंय टोमॅटो फ्लूचं सावट, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More