बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

वॉशिंग्टन | अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी 40 हजार ब्रिटिश नागरिकांचा अभ्यास केला. यातून कॉफी प्यायल्यानं कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. न्यूट्रिएंट्स नावाच्या नियतकालिकात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

कॉफीमध्ये आरोग्याला फायदेशीर केमिकल असतात. त्यांच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कॉफी प्यायल्यानं संसर्गातून होणाऱ्या आजारांचा धोका 10 टक्क्यांनी कमी होतो. भाज्या खाल्ल्यानंदेखील आजारांचा धोका घटतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे.

चहामुळेदेखील कोणतेही आरोग्यपूर्ण फायदे होत नसल्याचं संशोधन सांगतं. सॉसेज आणि बॅकॉन यासारख्या प्रक्रिया करण्यात आलेलं मांसामुळे आजार आणखी बळावू शकतो, अशीही माहिती संशोधनातून पुढे आली आहे

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट अजून तरी पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या डेल्टानामक व्हेरिएंटची पुढची पायरी डेल्टा प्लस विषाणू आहे. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचं आढळून आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

“राहुल गांधी जिंदाबाद घोषणा दिल्यावर माणसाचं सोडा बैलालाही ते सहन झाले नसावं”

‘गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार’; बैलगाडीवरुन कोसळलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रसाद लाड यांचा खोचक टोला

“काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More