बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर…’; अभ्यासातून महत्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलने केलेल्या अभ्यासातून महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. लसीचे दोन्ही डोसेस घेतलेले असतील, तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांनी घटतो, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलने दिलीये. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं.

कोरोनाप्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला असेल, तर मृत्यूचा धोका 82 टक्क्यांनी घटतो; तसंच लसीचे दोन्ही डोसेस घेतलेले असतील, तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांनी घटतो, असं या अभ्यासातून समोर आलं आहे.

तमिळनाडूच्या पोलिस खात्यातल्या 1,17,524 जणांवर एक फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला होता. लसीकरण केलेल्या आणि न केलेल्या पोलिसांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलने दिली आहे.

32,792 पोलिसांनी लसीचा एकच डोस घेतला होता. 67,673 पोलिसांनी लसीचे दोन्ही डोसेस घेतले होते. तसंच, 17,059 पोलिसांनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता. यापैकी 31 पोलिसांचा दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू झाला.

थोडक्यात बातम्या- 

“दिलीप कुमार नसलेली चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे नसलेलं राजकारण”

टेनिस विश्वातील मोठी घटना; विम्ब्लडनचा ‘बादशाह’ रॉजर फेडररचा मानहाणीकारक पराभव

तीन पक्षाच्या सरकारमुळं भाजपला विस्ताराची मोठी संधी- देवेंद्र फडणवीस

जी जबाबदारी मिळालीये त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन- भारती पवार

राज्यातील ‘या’ भागांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More