मुंबई | गत काही महिन्यांपासून राज्याच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा भार वाहणारी एसटी आपल्या क्षमतेनं रस्त्यावर धावताना दिसत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं विलीनिकरन व्हावं या मागणीसाठी आंदोलन पुकारलं आहे. सरकार आणि कामगारांमध्ये बैठका होवूनही या समस्येचं समाधान निघालं नाही.
त्रिसदस्यीय समितीनं देखील विलिनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला आहे. अशातच आता महामंडळाकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचा तोटा भरून निघत नाही तोपर्यंत नवीन नोकरभरती न करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे.
संप काळात एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. परिणामी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फटका प्रतिक्षा यादीतील तब्बल 2200 उमेदवारांना बसणार आहे. महामंडळाच्या या निर्णयावर आता नव्या उमेदवारांनी नाराजी वर्तवली आहे.
दरम्यान, महामंडळाचं विलीनिकरण शक्य नसल्याचा अहवला आल्यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची विनंती केली आहे.
थोडक्यात बातम्या –
“त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंचं तिकिट कापलं अन् मला अश्रू अनावर झाले”
“पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार”
“मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली”
नरेंद्र मोदींवर टीका करण्याची काही गरज नाही, कारण…- शरद पवार
Weather Update: पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
Comments are closed.