लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे मिळाले आहेत.

भाजपच्या अनेक नेत्यांनी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले असून काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यानंतर आता स्वत: महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलीये.

लाडक्या बहिणींना वेळेआधीच मिळाले पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin yojana) थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 32 लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण 80 लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

याआधी 14 ऑगस्ट रोजी राज्य करकारने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील दालनातून ओटीपी टाकून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

सरकारन रक्षाबंधनाच्या अगोदर 17 ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे जाहीर केले होते. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यांना 17 ऑगस्टपर्यंत हा निधी मिळण्याची शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ, मराठा आंदोलक आले, अन्…, नेमकं काय घडलं?

उन्हाचे चटके वाढले! राज्यात पाऊस पुन्हा कधी परतणार?, IMD कडून महत्वाची अपडेट

वातावरण तापलं! पुण्यात घडली धक्कादायक घटना

स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!

बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…