मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
नवी दिल्ली | मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे.
उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत. लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार स्थापन झालं आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची देखील आवश्यकता आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन आम्ही समजून घेणार आहोत. केंद्राची मदत मिळाल्यास राज्य वेगाने प्रगती करतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
गौतम अदानी मुकेश अंबानींच्या जिओला देणार टक्कर!
“धनुष्यबाण आमचा प्राण आहे, आधी प्राण जाईल मग धनुष्यबाण”
उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण….- बच्चू कडू
…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विठ्ठलाची महापूजा करता येणार नाही!
Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; धक्कादायक कारण समोर
Comments are closed.