बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई| सध्या जगभरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना लसीकरण वेगानं सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोना निर्बंध शिथिल करण्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येऊ शकतात. 1 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली असल्यांच टोपे यांनी सांगितलं.

पुढे टोपे यांनी सांगितलं की, निर्बंध शिथिल करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. बाकी 11 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अजूनही जास्त असल्यानं त्या राज्यांचे निर्बंध शिथील केले जाणार नाहीत.

दरम्यान, इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्याबाबत आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवत आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More