बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींचा दौरा! अजित पवार म्हणतात,”…मग आम्हाला विचार करावा लागेल”

मुंबई | कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं सध्या चांगलाच धुमाकुळ घातला आहे. ओमिक्राॅनच्या (Omicron) रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परिणामी सध्या विविध क्षेत्रातील निर्बंध पुन्हा लावण्याच सरकार (Government) विचार करत आहे. अशातच आता काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) 28 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) येणार असल्यानं राज्य सरकार (Maharashtra Government) त्यांच्या दौऱ्याला परवानगी देणार का? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात आतापर्यंत ओमिक्राॅनचे 20 पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. रूग्णवाढीचा दर जर असाच वाढत राहीला तर राज्यात निर्बंध लावण्याचा विचार सरकार करू शकतं. अशातच राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे.

व्हेरियंट जर असाच वाढता राहिला तर राहुल गांधी यांच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबत आम्हाला विचार करावा लागेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या सध्या महाराष्ट्रात आहे. परिणामी महाराष्ट्र सरकार अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याअगोदरच सरकारनं सर्व उपाययोजना करायवयास सुरूवात केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. परिणामी सध्या राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या चर्चा चालू आहेत. आता सरकार काय भूमिका घेतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

आधी अल्टीमेटम, मग हकालपट्टी! आता बीसीसीआय म्हणते, “Thank you Kohli”

“दुनिया में चु*** कमी नही”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात…

धक्कादायक! हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा Accident

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More