बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अशात तज्ज्ञांनी  महत्वाचा सल्ला दिलाय. आजवर ज्या लोकांनी कोरोनाला लांब ठेवलं आहे. म्हणजेच कोरोना अद्याप झालेला नाही त्यांनी कमीत कमी एक डोस तरी द्यावा, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दिल्लीमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही, त्यांनी या काळात कोरोना लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे. अशीच परिस्थिती दिल्लीत आहे, असं सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल यांनी सांगितलं. 10 ते 20 टक्के लोकसंख्या अशी आहे की ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. या लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात 81 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More