बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना व्हायरसमुळे तुम्हाला मधुमेहाचा आजार होऊ शकतो’; ICMRच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत आता नवनवीन आजारांनी डोकं वर काढलं आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांना म्युकरमायकोसिस आजाराचा गंभीर धोका आहे, असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं होतं. पण आता कोरोना झालेल्या लोकांनाच मधुमेह होण्याचा धोका असल्याचं आयसीएमआरच्या डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसने मधुमेहाचा आजारही होऊ शकतो, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्गाने तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. कारण कोरोना व्हायरस हा तुमची शुगर वाढवतो, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जर एखाद्याला शुगर नसेल आणि या काळात त्याला कोरोना झाला तर त्याला मधुमेह होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कोरोना वरील उपचारादरम्यान त्यांना मधुमेह होऊ शकतो. तर दुसरीकडे मधुमेह असणाऱ्यांना म्युकरमायकोसिस हा आजार देखील होण्याची शक्यता आहे, असं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोना बरोबरच आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका देखील वाढत आहे. केंद्र सरकारने गुरुवारी सर्व राज्यांना पत्र लिहून म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करावं, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोरोना झाल्यावर आणि कोरोना बरा झाल्यावर देखील रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रीत ठेवणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीसांनी ओबीसी आणि मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”

तरुणांनो तयारीला लागा, पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य

मास्क न घालता फिरणाऱ्या तरूणाचा मुजोरपणा; गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं

‘…म्हणून मी वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड’; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला मोठा गौप्यस्फोट

…म्हणून एक दोन नाही तर तब्बल 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीच्या दिशेने रवाना, कारण ऐकून बसेल धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More