बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनामुक्त झालेल्यांना टीबीचा धोका’; आरोग्य मंत्रालयानं दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये टीबीची प्रकरणं अचानक वाढत असल्याची चिंताजनक नुकतंच समोर आलं आहे. दररोज नवीन प्रकरणं समोर येत असल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व कोरोना रुग्णांना टीबी टेस्ट आणि टीबी रुग्णांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनामुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे अद्याप ठोस आणि पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता कोरोनातून बरं झालेल्यांनी टीबीची चाचणी करून घेणं गरजेचं आहे, असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

2020 मध्ये कोरोनाविरोधातील प्रतिबंधांमुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये जवळपास 25 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र आता समोर येत असलेल्या काही बातम्यांनी चिंता वाढवली आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.

देशात कोरोनाचा व्हायरसचा प्रार्दुभाव अजूनही आहे. दुसरी लाट आटोक्यात येत नाही तोवर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या…’; चित्रा वाघ यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

“अभिनय करून पोटापाण्याचं पहा, फार डोकं चालवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More