बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशील्ड लस घेतली का?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत आहे. देशात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यात कोविशील्ड (Covishield) लस घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे.

ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. ओमिक्रॉनची दहशत पाहाता ब्रिटनच्या सरकारने बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रिटनमध्ये देण्यात येणारी ऍस्ट्राझेनेका (AstraZeneka) लस काही महिन्यांनी ओमिक्रॉन विरोधात निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली सीरम इन्स्टिट्युटची (Serum Institute) कोवीशील्ड लस ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी नागरिकांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, ऍस्ट्राझेनेका निष्प्रभ ठरत असली तर या लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) मात्र ओमिक्रॉनविरोधात 76 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनने बुस्टर डोसबद्दल निर्णय घेतला असला तरी भारतात याबद्दल अजून काही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे भारतात कोविशील्डच्या बुस्टर डोसचा काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“Omicron चा प्रसार चिंताजनक, नियम पाळले नाही तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागणार”

“तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?”, अभिनेत्री मीनाक्षी राठोडची पोस्ट व्हायरल

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More