बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना

पुणे | कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक होता. तर दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर आता देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना सर्वाधिक बसण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर आता पुण्यात तिसरी लाट थोपवण्याची तयारी चालू झाली आहे. या संदर्भात बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने एक दिली महत्वाची सुचना दिली आहे.

पावसाळ्यात होणारे आजार आणि करोनाच्या संभाव्य धोक्यामुळे बालकांचे नियमित लसीकरण केलं नसल्यास पालकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन बालकांचे नियमित लसीकरण करावं, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आल्या आहेत. बालकांचे नियमित लसीकरण करावं की नाही, याबाबत पालकांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी लसी देखील उपलब्ध नाहीत. त्यावरून आता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लशी उपलब्ध असल्याचं राव यांनी स्पष्ट केलं आहे.

लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये. याची मात्र काळजी घ्या, काय करावं आणि काय करू नये ते नेमकं आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या, असंही डाॅक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, पुण्यात सध्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणावर ब्रेक लागला आहे. 18 ते 45 वयोगटाच्या वक्तींची लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता लसीकरण मोहिमेला वेग येणार असून 1 जून पासुन लसीकरण नियमितपणे सर्वांना चालू होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

“राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”

राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार

कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण; 26 मे रोजी शेतकरी काळा दिवस पाळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More