बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची हजेरी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासूून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधीपक्षाने सरकारला धारेवर धरलं आहे. नुकतंच केंद्र सरकार आरक्षणावर कायदे करण्याचा अधिकार राज्याला दिला आहे. त्यानंतर देखील आरक्षणावर राज्यांना कायदे करणं अशक्य झालंय. इंद्रा सहानी खटल्यात देण्यात आलेल्या निर्णयानुसार 50 टक्कांच्यावर आरक्षण देता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अधिकार असून देखील राज्य सरकारे कोंडीत सापडली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अशी मागणी राज्यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. याच प्रश्नावर रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अभिषेक मनु सिंधवी, खासदार संजय राऊत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत आरक्षणची मर्यादा शिथील करण्यात यावी, यावर सर्वांचं एकमत झालं आहे.

दरम्यान, राज्यांकडून काढून घेण्यात आलेले अधिकार राज्यांनी परत मिळावेत यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत. आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यासाठी केंद्राने संसदेत प्रस्ताव मांडावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘घरात बसलेलं तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमलं’; लोकलच्या निर्णयानंतर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

इंग्लंडच्या मदतील आला पाऊस, पहिला कसोटी सामना अनिर्णित!

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More