बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं मागील महिन्यापासून राज्यात अनलाॅकला सुरवात झाली आहे. पण अद्यापही राज्यात पुर्णपणे अनलाॅक केलं गेलं नाही. काही गोष्टींवर अद्यापही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. आता हे निर्बंध शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन दुकानांच्या वेळा वाढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टप्याटप्याने सर्व गोष्टी सुरू करण्याचं नियोजन तयार करण्यात येत आहे. दुकानांची वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाऊ शकते. तर 50 टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लोकांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबद्दल राज्य सरकार सावध भूमिका घेत असल्याचं दिसतंय. तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो.

थोडक्यात बातम्या-

“एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न”

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More