बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!

नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून उतरत असताना त्यांचा तोल गेला व ते पडले. त्यांच्या कमरेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून सध्या ते रूग्णालयात उपचार घेत होते.

एमएचआर(MHR) रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डाॅक्टराची एक टीम त्यांना तपासून गेली होती. त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा दिसून येत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीवबाबत पंतप्रधान मोदी, गांधी परिवार तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली.

या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांची तब्येत स्थिर असून आज त्यांना दिल्लीत रवाना करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजून 20 एअर अँब्युलन्सने (Ambulance) त्यांना नेण्यात येणार आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीली नेण्यात येणार आहे.

लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी जनता, कार्यकर्ते यांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कृपया दवाखान्यात गर्दी करू नये. यामुळे रूग्णालयातील इतर रूग्णांना त्रास होत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया रूग्णालयात येऊ नये, अशी विनंती एक व्हिडीओ जारी करत तेजस्वी यादवांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या

अभिनेत्री रश्मिकाला पहिल्या चित्रपटासाठी मिळाली होती ‘एवढी’ रक्कम!

धक्कादायक! कुत्रा भुंकल्यामुळे मालकासह तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

“संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा”

‘भारतातील, बेरोजगारी, महागाईला औरंगजेबच जबाबदार असेल’; ओवैसींचा मोदींना टोला

‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More