बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

नवी दिल्ली | भारत (India) हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जातात. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून नेहमी शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ‘जलसिंचन अभियान’, ‘मागेल त्याला शेततळे’ अशा अनेक योजना राबवण्यात येतात.

या सर्व योजनांमधील केंद्र सरकाराची एक योजना म्हणजे प्रधानंमत्री कृषी सन्मान योजना (scheme) आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवता येतो. 2018 पासून या योजनेेची सुरवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी सरकारकडून 6000 रुपये जमा केले जातात. दर चार महिन्याला 2 हजार जमा केले जातात.

आतापर्यंत अकरा हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात जमा झाले आहेत. शेतकरी आता पुढील हप्त्यासाठी अर्थात 12 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. मिळालेल्या माहितीवरून हा 12 वा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा संप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत.

तुम्ही जर शेतकरी असाल आणि याचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर ई-केवायसी करुन घेणं अनिर्वाय आहे. यामध्ये जर कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास 12 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. केवायसी(KYC) करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 जुलै पर्यंत या सगळ्या प्रक्रिया करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!

“…तरी देखील आदित्य ठाकरेंना मला साहेब बोलावं लागतं”, अन् रामदास कदमांना रडू कोसळलं!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More