बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोना महामारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. 1 मे पासून लसीकरणाचा चौथा टप्पा चालू झाला आहे. पण यातच शरिरातील अँटीबाॅडिज जास्त काळ टिकण्यासाठी दोन डोसमधील अंतर वाढवण्यात येत आहे. 3 मे रोजी सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले होते. यासाठी आता को-विन पोर्टलवर बदल करण्यात आला आहे.

को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाईन अपाॅईंटमेंट मिळू शकणार नाही. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी घेतलेली अपाॅईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केली जाणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये देखील आवश्यक बदल केले गेले आहेत. केंद्र सरकारने या बदलाबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे. को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अपाॅईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस न मिळताच माघारी यावे लागत आहे, अशी तक्रार करण्यात येत होती.

दरम्यान, सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लस वापरण्यात येत आहेत. तर लवकरच भारतात अमेरिकन लसीसाठी परवानगी मिळू शकणार असल्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

 ‘या’ जिल्ह्यात तौक्ते वादळात खलाशी बेपत्ता, घरांचं नुकसान तर गावांचाही संपर्क तुटला

‘या’ कारणाने पुण्यातील सर्वच लसीकरण केंद्र आज राहणार पूर्णपणे बंद

एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटं दाखविण्याचा हा काळ नाही- मोहन भागवत

हवामानाची माहिती देत असतानाच महिला अँकरसोबत घडलं असं काही की…; पाहा गंमतीशीर व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More