बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता मिळणार ‘ही’ मोफत सुविधा

मुंबई | मुंबईची जिवनवाहीनी असलेल्या लोकलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकलमध्ये रोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अनेकदा महत्त्वाच्या कामांसाठी प्रवाशांना इंटरनेटची गरज भासते. मात्र, नेटवर्क किंवा इतर अडचणींमुळे प्रवाशांना लोकलमध्ये इंटरनेट वापरण्यात अडचणी येतात. आता रेल्वेने (Central Railway) घेतलेल्या निर्णयाने प्रवाशांची ही अडचणही दूर होणार आहे.

लोकलमध्ये आता लवकरच प्रवाशांना वाय- फायची सुविधा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने 2 वर्षापूर्वी लोकलमध्ये ‘प्री-लोडेड’ इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. 2 वर्षात कोरोनामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. मात्र आता हा रखडलेला वायफाय प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येणार असून नवीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा समावेश असेल. प्रवाशांना केवळ मोबाईल वायफाय सुरु करून फ्री इंटरनेटचा वापर करता येणार आहे. सध्या एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, कोरोना काळात लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होेते. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा लोकल सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. सध्या डिसेंबरमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेची प्रवासी संख्या 64 लाखांवर गेली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…अन् तुम्ही माझी औकात काढताय, ‘तो’ पराभव विसरलात का?’; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

“शरद पवार यांना सोडून जाणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवा”

जितेंद्र आव्हाडांच्या कन्येचं दुसऱ्यांदा लग्न, पाहा लग्नाचा शानदार व्हिडीओ

धक्कादायक! Omicronच्या धास्तीनं ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊनची घोषणा

Omicronच्या भीतीनं परिक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन?; उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More