बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!

नवी दिल्ली | एकीकडे भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. कोरोनातून बरे करण्यासाठी अधिक प्रमाणात स्टेरॉइड दिलेल्या रुग्णांनाच म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशीचा आजार होत असल्याचं समोर आलं आहे.

ज्या रुग्णांना कोरोनातून बरे करण्यासाठी उपचारादरम्यान स्टेरॉइड देण्यात आले होते. त्यानांच म्युकरमायकोसीस होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट ज्या रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड देण्यात आले नव्हते. अशाना म्युकरमायकोसिस झाल्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

स्टेराइडमुळेच म्युकरमायकोसिस होत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील विश्लेषण एक ‘क्युरियस जर्नल ऑफ मेडीकल सायन्स’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. काही तज्ञ डॉक्टरांनी मिळून हे विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणासाठी त्यांनी रूबी रुग्णालयातील रुग्णाचा आभ्यास केला होता.

मागील 8 महिन्यात राज्यात 10 हजार 266 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. म्युकमायकोसिस झाल्यानंतर 15 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचं या विश्लेषणामधून समोर आलं आहे. कोरोनामुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळून आले आहेत. आत्तापर्यंत  भारतात म्युकरमायकोसीसचे तीन चतुर्थांश रुग्ण आढळून आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”

“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More