पुणे | भारतात अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत(Vande Bharat) या नव्या ट्रेनचं लाॅंचींग केलं आहे. भारतातील ही पहिली सेमी ट्रेन लाॅंच झाल्यापासून सतत चर्चेत आहे. अनेक ठिकाणी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून आता ही ट्रेन मुंबई-पुणे-सोलापुर (Mumbai-Pune-Solapur) अशी धावणार असल्याचं समजतंय.
येत्या 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईला या ट्रेनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. सोलापूरवरुन मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. ही एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई या मार्गावर धावणार आहे.
या वेळेस पहिलं उद्घाटन हे पुणे-सोलापुर येथून सुरु होईल आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता मुंबईला याचं उद्घाटन होणार असल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार समोर आलं आहे
वंदे भारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळं तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. ही ट्रेन पुर्णपणे स्वदेशी असून प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभवता येईल.
थोडक्यात बातम्या-
‘रितेश तू माझ्या शरीरातून…’, राखी सावंतचा राग अनावर
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं ठोकला निवडणुकीच्या राजकारणाला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ
‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
वेडची रेकाॅर्डतोड कमाई! आकडा वाचून तुम्हालाही लागेल वेड
…अन् रागाच्या भरात त्यानं कंडोम गिळलं