बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

नवी दिल्ली | एसबीआय बॅंकेच्या खातेदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 1 जुलैपासून एक नवा नियम लागू होणार आहे. आता महिन्यात चार विनामूल्य कॅश विड्रॉलनंतर बचत बँक ठेवी खातेधारकांकडून शुल्क आकारलं जाणार आहे.

एका वर्षामध्ये 10 पानांपेक्षा अधिक पानी चेक बुकसाठी शुल्क आकारलं जाईल. तसेच बीएसबीडी खात्यातील सेवा शुल्कामध्ये बदल केल्यानुसार 1 जुलैपासून या कामांसाठी बँक 15 ते 75 रुपये आकारेल. चेक बुकच्या 10 पानांसाठी 40 रुपये शुल्क व 25 पानांसाठी 75 रुपये शुल्क आकारलं जाईल. यासाठी जीएसटी वेगळा जोडला जाईल.

बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखांमध्ये, एटीएममध्ये, सीडीएममध्ये विना-आर्थिक व्यवहार आणि हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील. अतिरिक्त जीएसटी असलेल्या शाखा, एसबीआय एटीएम किंवा इतर बँक एटीएममधून चार मोफत कॅश विथड्रॉलपेक्षा जास्त व्यवहारावर ते प्रति विथड्रॉलवर 15 रुपये शुल्क आकारेल, असं एसबीआयने म्हटलं आहे.

एटीएम आणि शाखेतून चार मोफत कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारलं जाईल, असं असं एसबीआयने सांगितलं आहे. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना चेकबुक सेवांवर सूट देण्यात आली आहे, असंही बँकेने सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

“आम्ही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय, आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”

“फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, मराठी माणसाचा जाच तरी संपेल”

“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ”

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More