बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना एसईबीसीच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक स्तरावर सगळी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना काढण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात आदेश काढले आहेत. एसईबीसीच्या उमेदवारांना आता ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारनं एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएसचा लाभ देण्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. या अडचणी दूर करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारनं सर्व तहसीलदार आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; ममतांच्या ‘या’ मागणीवर मोदी म्हणाले ‘मी बघतो’

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; रस्त्याच्या कडेला बसलेल्या 18 कामगारांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More