बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसे कात टाकतेय; पुण्यातून महत्त्वाची माहिती समोर

पुणे | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने पक्षबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे. मनसेसुद्धा कात टाकताना दिसत आहे कारण मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले असून त्यांच्या संवाद कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

राज ठाकरे या दौऱ्यात शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहेत. आज पहिल्या दिवशी त्यांनी मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि राज्य शहर उपाध्यक्ष अशा 16 जणांशी तसंच शहर संघटक ,उपशहर अध्यक्ष,शहर सचिव विभाग अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माणविद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नाशिक दौऱ्यावरून राज ठाकेर थेट पुण्याला आले आहेत. उद्या म्हणजेच 20 जुलैला ते प्रभाग अध्यक्ष त्यासोबतच आजी माजी नगरसेवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती समजत आहे. राज ठाकरेंनी नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घेतलेली भेत त्यानंतर पुत्र अमित ठाकरेंकडे मनसेचं अध्यक्षपद देण्याची मागणी मनसे कार्यकर्ते करत आहेत. यामुळे राज ठाकरेंची मनसे पुन्हा चर्चेत आली आहे.

दरम्यान, 2012 साली मनसेचे पुण्यात सर्वाधिक 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मनसेला आपलं वर्चस्व ठेवता आलं नाही त्यामुळे ही संख्या 2017 साली 2 वर आली. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे कात टाकते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

एकनाथ खडसे यांना ईडीचा दणका; अटकेत असलेल्या जावयाबाबत ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.