बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

नवी दिल्ली | पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मूसलेवाला (Sidhu Mooselawa) याची 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील एका गावात गोळी घालून हत्या करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हत्येच्या काही दिवसांपूर्वी त्याची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. अधिक तपासात यामध्ये लाॅरेन बिष्णोई या गॅंगचा हात असल्याचं सांगण्यात आलं होतं. यामधील दोन आरोपींच्या संबधी महत्वाची बातमी समोर आली आहे.

या हत्येमध्ये पंजाबचे दोन माॅड्यूल शूटर नेमबाज मनप्रीत उर्फ मन्नू कूस्सा आणि जयसिंगरुप रुपा यांचा समावेश होता. या दोन नेमबाजांमध्ये आणि पंजाब (Punjab) पोलिसांमध्ये अमृतसरमध्ये चकमक झाली आहे. अटारी सीमेजवळील भकना कलान गावात ही चकमक झाली. हे दोघं मोगाच्या ग्रामीण भागात चोरीच्या दुचाकीवरुन फिरताना दिसले होते. नुकतंच या दोघांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

मिळालेल्या बातमीनुसार, यापूर्वी या दोघांना आत्मसर्मपण (surrender) करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र या दोघांनी फायरिंग सुरु केली. त्यामुळे ही चकमक झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोळीबार करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन पोलिसही जखमी झाले आहेत. जयसिंगरुप रुपा हा प्रथम मृत्यूमुखी पडला आहे. मनप्रीत सिंग उर्फ मन्नू कुस्सा याने सुमारे एकतास गोळीबार सुरू ठेवला. 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.

सिद्धू मूसलेवाला हा एक प्रसिद्ध गायक-गीतकार आणि रॅपर होता. यासोबतच तो एक काँग्रेस  नेता होता. 2017 मध्ये आलेल्या ‘So High’ या गाण्याने त्याला प्रसिद्धी मिळाली होती. 2071 ला या गाण्यासाठी त्यांला ब्रिटएशिया टीव्ही म्युझिक अवाॅर्ड्समध्ये (Britasia TV Music Awards) सर्वात्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

थो़डक्यात बातम्या

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय!

शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More