नवी दिल्ली | हिवाळा सुरु असून सध्या देशात कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणातील बदलांमुळे ऐन थंडीतही पाऊस कोसळत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
देशात यंदा कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या बऱ्यास दिवसांपासून राज्यात थंडीनं हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत आहे.
आयएमडीकडून थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर थंडीचा जोर हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीपासून ईशान्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, थंडीतही पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली उडी घेत आत्महत्या
“शरद पवारांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?”
कोरोना नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा थाटामाटात साजरा
“महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालतायेत”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.