बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश

पुणे | रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रामध्ये काळाबाजार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ होत असल्याचं आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा काळाबाजार होऊन दुप्पट-तिप्पट किमतीने इंजेक्शन खरेदी करण्याची वेळ रुग्णाच्या नातेवाईकांवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असतानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंजेक्शन बनवणाऱ्या 7 फार्मा कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना इंजेक्शनची एमआरपी कमी करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रोज 50 हजार इंजेक्शनचा पुरवठा होत असून एप्रिल अखेरपर्यंत दररोज दीड लाख इंजेक्शनची गरज भासू शकते.

आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीमध्ये काही कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राची गरज ओळखून महाराष्ट्राला देण्याचं कबूल केलं आहे. तसेच येणारे काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार असल्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी कंपन्यांनी त्याचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकार्‍यांना करावा. अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

चिंता वाढली… पुण्यात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

पुण्यातील कोरोना बेड्स आणि व्हेंटिलेटरची आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर

एड्स मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल, समोर आली आनंदाची बातमी!

‘…तेव्हा कल्याण पण मला म्हणाला असता, दादा तुम्हीही 2 दिवस इकडे नव्हता’; शपथविधीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More