बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न

उस्मानाबाद | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thakeray) सभागृहात विविध घोषणा केल्या होत्या. आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. अशावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही. आमदारांनी कधीच घराची मागणी केली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी देखील होणार नाही, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे. परिणामी महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडी सरकारनं अधिवेशनात घोषणा केली असताना चव्हाण यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. विरोधक उगाच आमदारांचा विषय काढत असल्याची टीका चव्हाण यांनी विरोधकांवर केली आहे.

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांच्या घराबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! 10वी नापास देखील करू शकतात अर्ज

डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

“महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आता बॅगा भरून ठेवाव्यात”

डिजीटल माध्यमासाठीचा पत्रकारिता पुरस्कार ‘थोडक्यात’ला; कृष्णा वर्पेंचा सन्मान

कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More