बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी… महत्त्वाचं काय? देश की धर्म?”

चेन्नई | कर्नाटकमधील उडुपी येथील एका महाविद्यालयात मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेमुळे देशभर धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकमधील या घटनेचे पडसाद देशात विविध राज्यांमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे. अशातच मद्रास उच्च न्यायालयानं एका धार्मिक याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदू व्यक्तींशिवाय इतरांना प्रवेश बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं महत्त्वाची टिपण्णी केली आहे. महत्त्वाचं काय आहे?, देश की धर्म?, असा सवाल करत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना फटकारलं.

कुणीतरी हिजाबच्या मागं जातंय, कुणीतरी धोतीच्या मागं जातंय. हे धक्कादायक आहे?, असं न्यायमूर्ती मुनीश्वर नाथ भंडारी आणि न्यायमूर्ती डी भारत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. हा एक देश आहे की धर्म वा इतर कशाच्या आधारावर वाटत गेलेला आहे? हे अजब आहे, असंही न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारत हा विविध जाती आणि धर्मांचा मिळून बनलेला एकसंध देश आहे. पण काही धार्मिक घटनांनी देशाच्या या प्रतिमेला तडा जात आहे. अशातच आता न्यायालयाच्या या निकालानं सर्वांना एक दिशा दिल्याचं पहायला मिळतंय.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार साहेबांना माझा शब्द…”; जयंत पाटलांनी दिल्या ‘प्राॅमिस डे’च्या हटके शुभेच्छा

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने कारावासाची शिक्षा

‘केम छो वरळी?’नंतर आता शिवसेनेचं ‘गोंयकारांनो कशे आसात?’

“ठाकरे-पवार एकत्र आल्यानं भाजपच्या पोटात दुखतंय, मविआचे स्टेअरिंग…”

…म्हणून भाजप नेत्याचा मदतीसाठी थेट मनसे नेत्याला फोन, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More