वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना, म्हणाले…
नवी दिल्ली | यंदाच्या उन्हाळ्यानं (Summer) तर सर्व रेकाॅर्ड ब्रेक करत उच्चांक गाठला आहे. यंदाच्या रखरखत्या उन्हाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्याना महत्त्वाच्या सूचना दिला आहे. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेसे पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि उपकरणांची पुरेशी उपलब्धता व सज्जता ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
जास्त उष्णता असलेल्या भागांत गारवा देणारी उपकरणे सतत कार्यरत राहतील, याची खात्री करावी, तसेच यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्याची सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. अशा आशयाचं पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलं आहे.
दरम्यान, दाचा उन्हाचा पारा एवढा आहे की उष्मघातानं अनेकांना आपला जीव गमवावा लगला आहे. एकीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे तोच दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
थोडक्यात बातम्या –
‘धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही’; अजित पवारांचा हल्लाबोल
राणा दाम्पत्यांना पुन्हा न्यायालयाचा झटका, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
“राज ठाकरेंना तुरुंगात टाका, त्यांचं डोकं शांत होईल”
मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
औरंगाबादमधल्या गर्जनेनंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
Comments are closed.