मुंबई | राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वातावरण गरम असताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं. यानंतर राणा दांपत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.
राणा दांपत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना नवनीत राणांच्या तब्येतीबाबत म्हत्त्वाची माहिती समोर येत आहे. नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने भायखळा कारागृहातून जेजे रूग्णालयात हलविण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.
नवनीत राणांची रवानगी भायखळा कारागृहात केल्यानंतरही नवनीत राणांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी त्यांना भायखळा कारागृहाच्या रूग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता नवनीत राणा यांना भायखळा कारागृहातून जेजे रूग्णालयात हलविण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई महालिकेने राणा दांपत्याला नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राणा यांच्या खार येथील घराची मुंबई महापालिकेकडून चौकशी होणार आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम किंवा काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे.
थोडक्यात बातम्या-
“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”
‘शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं’, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
रोगराई, राजकारण, पाऊस…, वाचा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत?
“मुख्यमंत्री बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेबांचं?”
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांचा झटका
Comments are closed.