Ladki Bahin Yojana l ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली होती आणि डिसेंबरपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. आता जानेवारीचा हप्ता आणि २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली आहे.
जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?
मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. आता २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. ही योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार?
महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. यावर बोलताना तटकरे म्हणाल्या की, याआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्मक विचार होईल, मात्र आता १५०० रुपयांचाच लाभ मिळणार आहे. यासाठी ३६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana l लाभार्थ्यांची यादी कशी तपासाल?
सध्या तरी, लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन उपलब्ध नाही. तुमचे नाव यादीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील/शहरातील संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील. ज्या महिलांचे या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्या महिलांना कमी केलं जाईल. जास्त काही फरक पडणार नाही, मात्र एखादा टक्का महिला योजनेतून कमी होतील, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
News Title: Hero MotoCorp to Launch Electric Splendor Soon!
महत्वाच्या बातम्या-
HERO स्प्लेंडरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्प्लेंडर
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!
सावधान! शनिदेवाकडून ‘या’ राशींच्या कर्मांचा हिशोब, नशीब बदलणार
गँगचा लीडर कोण?, CID च्या तपासात खळबळजनक खुलासा
—