मुंबई | व्हायरल रेस्परेटरी इन्फेक्शनमुळं काॅंग्रेस(Congress) पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया गांधींना भेटण्यासाठी राहुल गांधी(Rahul Gandhi) दिल्लीला आले होते. शुक्रवारी पुन्हा ते भारत जोडो यात्रेत(Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीला जावे लागले होते. त्यावेळेही उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये पोहचली आहे. सोनिया गांधींची तब्येत बिघडल्यानं त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी दिल्लीला गेले होते. परंतु ते शुक्रवारी पुन्हा हरियाणामध्ये यात्रेत सहभागी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना मोठा झटका!
- रितेश-जेनेलियाचा ‘वेड’ ठरला सुपरहिट, केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई
- सर्वात मोठी बातमी; संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?
- ‘…तर पूर्ण नागडा करीन’; संजय राऊतांचा राणेंना इशारा
- संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं घ्यायचा विचार करताय! मग जाणून घ्या ताजे दर