बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेता पद्मश्री नसीरुद्दीन शहा यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट!

मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शहा यांना मुंबईतील खारमध्ये असणाऱ्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना निमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. नसीरुद्दीन शहा गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णालयात आहेत.

नसीरुद्दीन शाह हे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना न्युमोनिया झाला असून त्यावरील उपचार सुरू आहेत. तपासणीत फुफ्फुसांमध्ये पॅच आढळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असं मॅनेजरनं सांगितलं.

यापूर्वी अनेकदा अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या तब्येतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु आज त्यांच्या प्रकृतीबाबत आलेली माहिती ही खरी ठरलीय. 70 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना दोन दिवसांपासून खार इथल्या हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याच रूग्णालयात दिलीप कुमार यांना मंगळवारी श्वास घेताना अडचणी येत असल्याने दाखल करण्यात आलंय.

दरम्यान, 70 वर्षीय नसीरुद्दीन यांनी अनेक नाटकं, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलंय. नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

चिंता वाढली! मंगळवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजारांची वाढ

“उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं”

‘तुझे काही व्हिडीओ माझ्याकडे आहेत, उत्तर दे नाहीतर…’, ट्विटरवर सनी लिओनीला मिळतेय धमकी

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More