बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

मुबंई | दहावी- बारावीची बोर्डाची परिक्षा (Board Exam) जवळ आली आहे. विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. यातच आता बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यामुळं ब बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेबाबत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior College in the State) शिक्षकांच्या बहुसंख्य मागण्या अनेकवर्षे प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण करण्याच्या केवळ आश्वासन दिलं जात आहे. याबाबत कोणतीही अंमलबजावणी करत नसल्याचं दिसत आहे. याकारणामुळं उच्च माध्यमिक शिक्षकांनी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

उच्च माध्यमिक शिक्षकांनी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचं अर्थात उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी (for resolution) वारंवार पत्र देण्यात आली. बैठका झाल्या. या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

या मागण्या केवळ तात्पुरता राहिल्या असून त्याबाबतचे आदेश अद्याप निघाले नाहीत. यामुळेच राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, रिक्त पदे भरण्यासाठी(To fill vacancies), निवृत्तीचं वय 60 करण्यासाठी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणं 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना त्वरित लागू करावी इत्यादी मागण्या शिक्षकांनी राज्यशासनाकडं केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या