चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा
पुणे | होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी होम असोलेशन नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरल्यास त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. सोसायटी मधील चेअरमन यांनी या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावं अन्यथा संपुर्ण सोसायटी सिल करण्यात येईल, असं देखील राजेश पाटील यांनी सांगितलं आहे.
दुकानांमध्ये नियमापेक्षा अधिक गर्दी आढळून आल्यास तसेच कोरोना 19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं आढळून आल्यास अशा दुकानधारकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या माहे मार्च 2021 मध्ये कोविड-19 आजाराच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्त दालनात आज प्रशासकीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
“मी जबाबदार” ही मोहिम शासनाने सुरु केली आहे. या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, व्यक्ती व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आधी नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केलं आहे. कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने शहरात विविध ठिकाणी 50 केंद्र सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.
दरम्यान, मास्कचा वापर करणं, व्यक्ती व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर राखणं आदी नियम जे पाळणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नियमांचं प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानधारकांवर संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल तसेच ते दुकान तात्काळ सील केले जाईल. शिवाय त्या दुकानधारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधित दुकानदाराने घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
…तर मग सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका- चित्रा वाघ
ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे
भरधाव रिक्षाच्या धडकेनं तरुणी कोमात, 9 दिवस झाले पोलिसांना रिक्षाचालक सापडेना
‘मी वचन देतो….’; पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Comments are closed.