बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना महामारीचं संकट अजूनही टळलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. आता दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं महत्वाची माहिती दिली आहे.

लसीकरण हे कोरोनावर मात करण्याचं एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात येत असलेलं पहायला मिळत आहे. चीनमधील सायनोवॅक आणि सायनोफार्म या लसी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जेष्ठ नागरिकांवर लसीचा ठराविक काळापुरताच प्रभाव होत आहे आणि त्याचा प्रभावही लवकर ओसरत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे इतर आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी या लसीचा तिसरा डोस टोचून घेण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

दरम्यान, पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. यामागे शास्त्रीय कारण आहे. पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना संसर्गापासून आपला बचाव होण्यास मदत होते.

थोडक्यात बातम्या – 

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

विराटचं स्वप्न भंगलं! रोमांचक सामन्यात कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More